Tuesday, April 21, 2015

Spirit of Malvani Konkani People


आज मालवणी माणसाच्या जीवनात जी स्थिरता आणि संपन्नता इलीसा त्येका मालवणी माणसाची मालवणी कोकणी संस्कृती जबाबदार आसा. आपल्याकडे कर्जा काढून लग्ना होनत नाय. हौस येगळी पण अंथरून बघूनच कोकणी माणूस पाय पसरता. उगाच दिखावो करुक लाखोचो खर्च करना नाय. कोकणी रीतीरिवाजानुसार लग्नात बोलणी करताना चेडवाकडच्यांका आणि झीलाकडच्यांका कसो समान आणि कमी खर्च होयत ता बगतत. पोशाकाचो खर्च आणि मंडप खर्च वाटून घेवची परंपरा आसा. कोकणी पंरपरेत हुंडो अजिबात मान्य नाय. कोकणी माणूस मुळातच विचार करून निर्णय घेनारो. अशा रीवाजांमुळे नवीन जीवनात पावल ठेवताना जोडी कर्जबाजारी नसता. शिवाय शेजाऱ्यान जीप घेतल्यान म्हणान कोकणी माणूस जीप नाय घेवचो. चार गाळये घालीत आणि ता जीप घेणा कसा चुकीचा ह्या पण सांगीत पण खर्च करताना विचार करून करतलो. कायय झाला तरी कोकणी शेतकरी कधी आत्महत्या नाय करुचे कारण काड्ये पासून पिड्यातगयात प्रत्येक वस्तूचा मोल कोकणी माणसाक माहित आसा. एक काळ होतो कोकणी माणूस मनीऑर्डर वर जगा. आता कोकणी माणूस स्वत: दुसऱ्यांक मनीऑर्डर पाठयत. आज एक घर असा दिसाचा नाय जय कुपोषण आसा किंवा दोन वेळचा जेवण मेळना नाय. ह्या spirit of konkani people कायम ठेवया आणि अशेच विकसित होयत जावया..

No comments:

Post a Comment

We are registered with

Blog Directory
Related Posts with Thumbnails